ग्रामपंचायत भाट्ये, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी.

भाटये हे रत्नागिरी शहरापासून अवघ्या १ कि.मी. अंतरावर वसलेले एक सुंदर किनारी गाव आहे. पूर्वेला काजळी नदी, पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला नदी व समुद्राचा संगम आणि दक्षिणेला डोंगररांगांनी वेढलेले हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. सुमारे २ कि.मी. लांबीचा रमणीय समुद्रकिनारा भाटये गावाला लाभला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ३२४८ आहे. गावातील प्रमुख व्यवसाय शेती आणि मासेमारी असून, येथील लोक परिश्रमी आणि एकजुटीने जगणारे आहेत.

भाटये हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील पहिले आरमार प्रमुख मायाजी भाटकर उर्फ मायनाक भंडारी यांचे जन्मस्थान आहे, आणि त्यांचे समाधीस्थळही येथे आहे. गावात कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत नारळ संशोधन केंद्र आहे. येथे सर्वधर्मसमभाव आढळतो — हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र राहून सण-उत्सव साजरे करतात. पीर शाक्रामुद्दीन दर्ग्यावर माघ पौर्णिमेला साजरा होणारा उरुस हा या ऐक्याचा उत्तम नमुना आहे, ज्यामध्ये २०,००० ते २५,००० भाविक सहभागी होतात.

ऑनलाईन सेवा

मान्यवर व्यक्ती

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री.अजित पवार

श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. जयकुमार गोरे

श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. उदय सामंत

श्री. उदय सामंत
मा. मंत्री, उद्योग
तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा

श्री. योगेश कदम

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)

श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी

श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)

श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद